¡Sorpréndeme!

Job Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha

2025-03-31 5 Dailymotion

Job Majha | भारतीय रेल्वे मध्ये भरती | नोकरीची संधी | 31 March 2025 | ABP Majha




**भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट (एएलपी) या पदाकरिता भरती होती.** यासाठी शैक्षणिक पात्रता ही लवकरच उपलब्ध केली जाईल. एकूण जागा आहेत लोको पायलटच्या 9900. याकरता वयाची अट आहे 18 ते 30 वर्षापर्यंत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 मे 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहे  [वेबसाईट नाव].

**यानंतर वळूया पुढे, एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी मध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट बी या पदाकरिता भरती होती.** यासाठी शैक्षणिक पात्रता बी किंवा बीटेक झाला असणं गरजेच आहे. एकूण जागा आहेत 105. याकरता वयाची अट आहे 35 ते 40 वर्षापर्यंत. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहे ada.gov.in.

**तर यातलीच पुढची पोस्ट आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट सी.** यासाठी शैक्षणिक पात्रता बी किंवा बीटेक झालं असणं गरजेच आहे. एकूण जागा आहेत 32. याकरता वयाची अट आहे 35 ते 40 वर्षापर्यंत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीखे 21 एप्रिल 2025 आणि अधिकृत वेबसाईट आहे ada.gov.in. 

आशा आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. धन्यवाद!